भूजल कायद्याच्या विरोधात हरकती नोंदवा-आ. थोरात

संगमनेर –भूजल कायद्यामुळे शेतकरी अडचणीत सापडणार आहे. यापुढे नवीन विहीर खोदाईसाठी शासनाची परवानगी आवश्‍यक असणार आहे. दोनशे फुटाखालील पाणी उचलता येणार नाही. विंधन विहीर घेणे बंद होईल. भूजल कायदा हा शेतकऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत अडचणीचा ठरणार आहे. या कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवा, असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
अमृतवाहिनी बॅंकेच्या सभागृहात झालेल्या गरुड कुक्कुटपालन व हरिश्‍चंद्र फेडरेशन या सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत थोरात बोलत होते. ते पुढे म्हणाले, की भंडारदरा व निळवंडे सह प्रवरा खोऱ्यातील पाणी जायकवाडीला देऊ नये, यासाठी हरिचंद्र फेडरेशनने सर्वप्रथम न्य.न्यायालयात आव्हान दिले. रस्त्यावर व न्यायालयात दोन्ही ठिकाणी आपण लढलो. या सरकारने समन्यायी कायद्याचा चुकीचा अर्थ काढला असून शासनाचे कायदे व नियम अन्यायकारक आहेत. सरकारने भूजल कायद्याचा मसुदा तयार केला असून कोणते पीक घ्यायचे याबाबत नोंदणी करणे, विहिरीतील पाणी उपशावर कर तसेच काही काळासाठी पाणी उपसाबंदीबाबत कठीण नियम पुढील काळात लादले जाणार आहेत. संगमनेर तालुक्‍यात अत्यंत कमी पाऊस पडतो. आपल्याकडे विहिरीचे बागायत असल्याने भूजल हा कायदा अत्यंत अडचणीचा ठरणारा आहे. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी भूजल कायद्याविरोधात जास्त जास्त हरकती नोंदवा
या प्रसंगी राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, बाजीराव खेमनर, ऍड. माधवराव कानवडे, इंद्रजीत थोरात आदी उपस्थित होते

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)