भूजलपातळी वाढीत बारामती जिल्ह्यात अव्वल

बारामती- बारामती तालुक्‍यातील जिरायती भाग कायमस्वरुपी दुष्काळग्रस्त म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, याच भागात जलयुक्‍त शिवार व जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने जिरायती भागातील भूजलपातळी वाढली आहे. जलयुक्‍त शिवार योजनेच्या यशस्वी प्रयत्नामुळे भूजलपातळी वाढीमध्ये बारामती तालुका जिल्ह्यात अव्वल ठरल्याचे भूजल सर्वेक्षणात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी जलयुक्‍त शिवार अभियान वरदान ठरले आहे. बारामती तालुक्‍यातील जिरायती भागातील 2638. 683 हेक्‍टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. दरम्यान, डिसेंबरपासूनच टॅंकरची मागणी असणाऱ्या गावांमध्ये यंदा मार्च अखेर देखील टॅंकरची मागणी नसल्याने जलयुक्‍त शिवार तसेच जलसंधारणांच्या कामांची ही किमया असल्याचे मानले जात आहे. असे असले तरी वाढलेली भूजलपातळी टिकवण्याचे खरे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्यासाठी पाणीवापराचे तंत्र आवगत करणे काळाची गरज आहे.
बारामतीचा अर्धा भाग बागायती, तर अर्धा भाग जिरायती आहे. जिरायती भाग कायमस्वरुपी दुष्काळाशी दोन हात करीत आहे. त्यातच गेली चार वर्षे पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. मात्र, 2016-17 मध्ये शसनाच्या जलयुक्‍त शिवार योजनेच्या माध्यमातून जिरायती भागात मोठ्या प्रमाणात कामे झाली. शेत बांधबंदस्ती, ढाळीचे बांधबंदिस्ती, माजगी, मातीचे नाला बांध, सिमेंटचे नालाबांध, वळण बंधारा, सिमेंट नालाबांधातील गाळ काढून खोलिकरण, विहीर पुनर्भरण आशा प्रकारची कामे करण्यात आली. त्यामुळे पावसाचे प्रमाणा कमी असले, तरी देखील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली आहे.
जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामामुळे या भागाला दिलासा मिळाला आहे. महसूल, कृषी व पंचायतीच्या माध्यामतून राबविण्यात आलेल्या योजनेमध्ये गावकऱ्यांचा लोकसहभाग देखील तितकाच महत्त्वाचा ठरला आहे. पाण्याची गरज लक्षात घेऊन गावकऱ्यांनी ही योजना यशस्वी करण्यावर भर दिला. त्याचबरोबर मुंबईतील सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट, तालुक्‍यातील साखर कारखाने, एन्व्हार्नमेंटल फोरम ऑफ इंडिया या व अन्य संस्थांनी देखील जलसंधारणाच्या कामासाठी मोलाची मदत केली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणेणे जोर धरला. त्यामुळे जलसंधाराणाची कामे यशस्वी झाली. जलसंधाराणाच्या कामाबरोबरच या भागाला साठवण तलावाच्या कामांची जोड दिल्यास या भागातील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागण्यास मदात होणार आहे. बागायती भागाबरोबरच जिरायती भागात देखील उसाच्या पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. सर्वाधिक पाणी लागणारे पिक म्हणून उसाच्या पिकाकडे पाहिले जाते. त्यामुळे वाढलेली भूजलपातळी लवकर संपण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी वापराचे तंत्र शिकणे काळाची गरज आहे.

 • 2016-17तील 58 कामे प्रलंबीत
  जलयुक्‍त शिवार योजनेंतर्गत 2016-17 मध्ये एकूण 804 कामे होती. त्यापैकी 724 पूर्ण, 23 कामे प्रगतीपथावर, तर 58 कामे प्रलंबीत आहेत. 2017-18 मध्ये आराखड्यानुसार 631 कामे आहेत. त्यापैकी 65 कामे पूर्ण, 56 कामे प्रगतीपथावर, तर 510 कामे प्रलंबीत आहेत.
 • जिरायती भागातील या गावात झाली कामे
  (वर्ष : 2016-17) : देऊळगाव रसाळ, गोजूबावी, जैनकवाडी, जळकेवाडी, जळगाव कडेपठार, कटफळ, लोणी भापकर, मोरळवाडी, मोरगाव, नारोळी, पळशी, सायंबाचीवाडी, सोनवडी सुपे, सुपा, उंबरवाडी, उंडवडी सुपे वाकी.
  (वर्ष : 2017-18) जळगाव सुपे, आंबी बुद्रुक, माळवाडी, कऱ्हावागज, नेपतवळण, बऱ्हाणपूर, अंजनगाव, कारखेल, कोळोली, निंबोडी, सावळ, कानाडवाडी, मगरवाडी, चौधरवाडी, सोनकासवाडी, ढाकाळे, मुढाळे, मोढवे .
 • 5863.74 टीसीएम पाणीसाठा
  जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत 2016-17मध्ये करण्यात आलेल्या कामांमध्ये 5863.74 टीसीएम पाणीसाठा प्रत्यक्षात निर्माण झाला. तर विहिरींच्या पाणीपातळीत 1.72 मी. एवढी वाढ झाली. त्यामुळे 2638. 683 हेक्‍टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे.
 • शासकीय पातळीवरील सर्व यंत्रणा तसेच लोकसहभाग विविध संस्था, संघटना आदींच्या माध्यमातून तालुक्‍यात जलयुक्‍त शिवार तसेच जलसंधारणाची कामे झाली आहेत. सर्वांनी एकत्रितपणे काम केल्यानेच जलयुक्‍त शिवार अभियान यशस्वी झाले आहे. तालुक्‍यातील जिरायती भागातील भूजलपातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे 2638.683 हेक्‍टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. भूजलपातळी वाढीमध्ये बारामती तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. उपलब्ध भूजलसाठा टीकावण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. त्यासाठी पिकरचना व पाणी वापराचे तंत्र महत्त्वाचे आहे.
  – संतोषकुमार बरकडे , कृषी अधिकारी, बारामती तालुक

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)