भूगाव येथील महिला तलाठी, कोतवाल अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवीन वर्षातील पहिल्याच प्रकरणाची नोंद


भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांनी मुळशीची “अब्रु’ वेशीवर

पुणे/बावधन – मुळशीच्या तहसीलदारांसह कथित एजंटाला 1 कोटीच्या लाचप्रकरणात कारवाई करुन अटक केलेची घटनेला पाच दिवस होत असताना तालुक्‍याच्या महसूल विभागाच्या महिला तलाठीने भ्रष्टाचाराचा अजून एक कारनामा केला आहे. यात ही महिला तलाठी आणि कोतवाल अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत.

वारस नोंदीच्या प्रकरणात नाव नोंद व क्षेत्र नोंद 7/12 वर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच घेताना गुरूवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला तलाठी आणि कोतवाल यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भूगांव (ता. मुळशी) येथे करण्यात आली. मनीषा सर्जेराज पवार (वय 37, तलाठी-भूगाव) आणि विठ्ठल गुलाब सुर्वे (वय 37, कोतवाल-भूगाव) अशी त्याची आरोपींची नावे आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तक्रारदार यांचे क्षेत्र व वारस नोंदीचे प्रकरणात मुळशी तहसीलदार यांनी आदेश दिला होता. त्यानुसार भूगावमधील जमिनीच्या 7/12 वर नाव नोंद करणे व क्षेत्र नोंदी घेण्यासाठी तक्रारदारांनी भूगावच्या तलाठी कार्यालयात संपर्क साधला. तेव्हा तलाठी मनीषा पवार यांनी 50 हजार रुपयांची कोतवाल विठ्ठल सुर्वे यांच्यामार्फत लाच मागितली. त्यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यावर लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुरुवारी भूगाव येथील तलाठी कार्यालयात सापळा रचण्यात आला. कोतवाल यांच्यामार्फत तक्रारदाराकडून 50 हजार रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, उपअधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनाम बळप यांच्या सहकार्ऱ्यानी भूगांव येथे सापळा रचून केली. दरम्यान, सलग घडणाऱ्या या प्रकरणांनी मुळशी तालुक्‍याची अब्रू वेशीवर टांगली गेल्याचे दिसून येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

1 COMMENT

  1. मुळशी तालुक्याची अब्रू वेशीला टांगली गेली असे आपले वृत्त अगदी बरोबर आहे. कोट्यांची लाच घेणारे व देणार सर्वांचे बाप होऊ पाहत आहेत. कायद्याच्या धाक त्यांना नाही. परत नोकरी मिळेलच असा ठाम विश्वास त्यांना आहे. मुळशी तालुक्यात बांधकाम व्यवसाय पर्वणीवर आहे. सर्वच हो हो सर्वच पार्किंग विकत आहेत. मोकळी जागा सुद्धा पार्किंग म्हणून विकत आहेत. अनेक अनाधिकृत अर्थात बेकायदेशीर बांधकामे झालेली आहेत. त्यामुळे सामान्य माणसांना घर विकत घेणे परवडत नाही. बांधकाम पूर्णत्वाचा दाखला न घेत अनेक लोकांना बिल्डरांने घरे विकलीत. हा दाखला सुद्धा लाच खाऊनच दिला जातो. अनेक प्रकल्प रेगाळंलेले आहेत. अनेक खरेदीदार फसविले गेलेले आहेत. अनेकांची प्रकरणे न्याय प्रविष्ट आहे. असे नाही की यापूर्वी मुळशी येथील तहसिलदार यांना धरल्या गेलेले नाही. जाणकार लोकांना ठाऊक असेलच के यापूर्वी नायब तहसिलदार सुद्धा लाच घेताना अडकला होता (२००७/२००८). सामान्य लोकांना हुसकावून लावतात. यालाच म्हणतात झीरो पेंडेंसी. चंद्रकांत दळवी साहेब पुरस्कार परतील काय? एकदरींत मुळशी तहसील कार्यालय म्हणजे आयएसओ प्रमाणित लाच कार्यालय आहे अशी शंका येते. बघूया नवीन तहसिलदार किती बांधकाम व्यावसायिकांना दंड करतात आणि आपले कर्तव्य बजावितात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)