भूगावांत विशेष मुलांसाठी मिठाई

पिरंगुट- सद्यःस्थितीमध्ये सर्वत्र दिवाळीचा सण जोरदार साजरा केला जात असताना भूगांव (ता.मुळशी) येथील ओम श्री साई मतिमंद मुलांच्या निवासी पुनर्वसन प्रकल्प येथील सर्व विशेष मुलांना आणि मुलींना मिठाई,आकाश कंदील आणि पणत्यांचे वाटप करण्यात आल्याने या विशेष मुलांची गोड दिवाळी आणखी गोड झाली. भाजप युवा मोर्चाचे भोर, वेल्हा, मुळशीचे अध्यक्ष विठ्ठल शेलार आणि बोतरवाडी ग्रामपंचायत सदस्य समीर शेलार यांच्या वतीने ओम श्री साई मतिमंद मुला-मुलींची निवासी पुनर्वसन प्रकल्प या ठिकाणच्या सर्व विशेष मुलांना आणि मुलींना दिवाळी निमित्त मिठाई, आकाश कंदील, तसेच पणत्यांचे वाटप करून दिवाळीचा सण त्यांच्याबरोबर साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच सतीश शेलार, ग्रामपंचायत सदस्य समीर शेलार, आदर्श शिक्षक संतोष गावडे, दीपक करंजावणे, होंडा शोरूमचे संचालक संगम शेलार, महेश वाघ, अभिजीत शेडगे, योगेश शेलार, सागर शेलार, यश पडवळ आणि उमेश बोत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक भोर वेल्हा मुळशी अध्यक्ष विठ्ठल शेलार आणि बोतरवाडी ग्रामपंचायत सदस्य समीर शेलार यांच्या वतीने करण्यात आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)