भूगावच्या सरपंचपदी विजय सातपुते

पिरंगुट-आदर्श ग्रामपंचायत भूगावच्या सरपंचपदी विजय नाना सातपुते यांची निवड झाली. भूगाव गावचे माजी सरपंच मधुकर गावडे यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाल्याने या ठिकाणी निवडणूक लागली होती. सरपंचपदासाठी ग्रामपंचायत सदस्या वैशाली सणस व सातपुते यांनी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक झाली. यामध्ये विजय सातपुते यांना 9 तर सणस यांना 4 मते मिळाली.
यावेळी भूगाव गावचे माजी उपसरपंच दगडू काका करंजावणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब चोंधे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम करंजावणे, माजी सरपंच बाळासाहेब शेडगे, सचिन मिरघे, नारायण करंजावणे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती शेडगे, दत्तात्रय करंजावणे, एकनाथ शेडगे माजी तंटामुक्ती उपाध्यक्ष लक्ष्मण पोळ, दिलीप चोंधे, बाळकृष्ण सुर्वे, अजित इंगवले, जितेंद्र इंगवले, स्वस्तिक चोंधे, जीवन कांबळे, उपसरपंच जयश्री कुंभार, माजी उपसरपंच सुजाता सांगळे, मनिषा शेडगे, हर्षा चोंधे, सुरेखा कांबळे, सुरेखा चोंधे, प्रमिला चोंधे, वनिता तांगडे, अरूण साळुंके, दशरथ इंगवले, चंद्रकांत चोंधे, बाळकृष्ण इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते. गावात पिण्याच्या पाण्याची सोय व गावाच्या विकासाची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे, असे यावेळी सातपुते यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)