भूकंपासंदर्भात सतर्क राहण्याच्या सूचना

अधिवेशनाच्या सुट्टीत आ. देसाई यांची अधिकार्‍यांसमवेत तातडीची बैठक

काळगाव, दि. 23 (वार्ताहर) – कोयनानगर परिसरात 22 नोव्हेंबरला 7.29 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. याची माहिती मिळताच हिवाळी अधिवेशनाकरीता मुंबईत असणार्‍या आ. देसाई यांनी पाटणचे उपविभागीय अधिकारी, कोयना धरण व्यवस्थापनचे कार्यकारी अभियंता यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून माहिती घेतली. तर दुसर्‍या दिवशी अधिवेशनातील सुट्टीत येवून संबधित सर्व अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेवून सूचना दिल्या.
शुक्रवारी गुरुनानक जयंतीनिमित्त शासकीय सुट्टी असताना देखील हिवाळी अधिवेशनातून सुट्टी असल्याने तातडीने येत आ. शंभूराज देसाई यांनी 22 रोजी झालेल्या 2.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या संदर्भात तातडीने तहसिल कार्यालयात तालुकास्तरीय सर्व संबधित अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेतली. बैठकीस प्रातांधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, पोलीस निरीक्षक यु. एस. भापकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गुजर, कोयना धरण व्यवस्थापनातील आर. वाय. खंदारे, डी. एम. चौधरी, मंडलाधिकारी ए. एल. संकपाळ, सहा. गटविकास अधिकारी वाघ, विस्तार अधिकारी शेजवळ, शिवसेना संपर्कनेते जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील, बबनराव भिसे उपस्थित होते.
भूकंपाचा केंद्रबिंदू वारणा खोर्‍यात जावळे गावाच्या 5 कि. मी. अंतरावर असल्याची माहिती खंदारे यांनी दिली. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे सतर्क रहा असे त्यांनी सांगून 2018 मध्ये जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत एकूण किती भूकंप झाले याची माहिती आमदार शंभूराज देसाईंनी घेतली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)