भूकंपाच्या धक्‍क्‍यांनी दिल्ली हादरली

नवी दिल्ली: भारताची राजधानी दिल्लीसह परिसर रविवारी भूकंपाच्या हलक्‍या धक्‍क्‍यांनी हादरली. भूकंपाचे हे धक्‍के दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील काही भागात जाणवले. मात्र, यात कोणत्याही प्रकारची वित्त आणि जीवीतहानी झाली नसल्याचे समजते.

हरिणायामधील रेवाडी, धारूहेडा आणि कुंड येथे भूंकपाचे धक्‍के बसले. हे धक्‍के सुमारे 10 सेकंदापर्यत जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणाच्या झज्जर जिल्हात जमीनीच्या 10 कि.मी. खाली होते. रिक्‍टर स्केलवर याची तिव्रता 3.8 नोंदविण्यात आली. यापूर्वी 1 जुलै रोजी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्‍के बसले होते. या भूकंपाची तिव्रता 4.0 इतकी होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)