भूईंज परिसरात अवैध वाळू साठे जप्त

वाई तहसिलदारांनी टाकले छापे;15 लाख रुपयांची वसुली
भुईंज- वाईचे तहसिलदार रमेश शेंडगे यांनी भुईंज परिसरात वाळू माफियांच्या ट्रकवर छापे टाकत तब्बल 15 लाख रुपयांचा महसूल जमा केला.या त्यांच्या धडक मोहिमेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे. या पुढे अशाच प्रकारे धडक कार्यवाही सुरु राहील अशी माहिती तहसिलदारांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.

वाळू माफीया मार्फत बाहेरच्या तालुक्‍यातुन वाई तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वाळुची विना परवाना चोरटी वाळुची वाहतुक होत असलेची माहिती वाईचे नुतन तहसिलदार रमेश शेंडगे यांना मिळाली. त्यांनी मंडलाधिकारी आणि तलाठी यांना सोबत घेऊन रात्र दिवस गस्त घालायला सुरवात केली. या दरम्यान त्यांनी तालुक्‍याच्या अनेक भागात छापे टाकले. वाळू वाहतुकीसाठी वापरले जाणारे 20 डंपर त्यांनी पकडले. हे डंपर वाई आणि भुंईंज पोलिसांच्या स्वाधिन करुन त्यांच्यावर एका ब्रास वाळुवर पाच पट दंड आकारला आहे. प्रत्येक डंपरला 1 लाख रुपयांचा दंड करत झालेल्या या उच्चांकी कारवाईत तब्बल 15 लाख रुपयांचा महसुल गोळा केला आहे. या धडाकेबाज कारवाईने वाळु माफीयांचे धाबे दणाणलले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही कारवाई थांबवावी म्हणून विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र रमेश शेंडगे यांनी हा दबाव झुगारत सरकारी कामकाजात अडथळा आणला तर अडथळा आणल्या बद्दल फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसे प्रसिध्दीपत्रक तहसिलदार कार्यालयाच्या वतिने प्रसिध्द करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)