भुवनेश्वर कुमार-अभिनेत्री अनुश्रमी यांचे डेटिंग

मुंबई : भारतीय संघाचा भुवनेश्वर कुमार याला अभिनेत्री अनुश्रमी सरकार हिने क्‍लिन बोल्ड केल्याची माहिती समोर येत आहे. ते दोघे एकमेकांना डेटिंग करत असल्याचे सांगितले आहे.
शुक्रवारी रात्री टॉलीवूड स्टार अभिनेत्री अनुश्रमी सरकारसोबत भुवनेश्‍वर डिनरला गेला होता. त्याला अनेकांनी तिच्यासोबत पाहिले, त्यामुळे डेटिंगमध्ये तथ्य असल्याला दुजोरा मिळाला. भुवनेश्वर कुमार सध्या इंडियन प्रीमियर लीग 2017 मध्ये चांगलाच चमकला. तो सध्या सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. या बॉलरने एक इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली आहे.. त्यामुळे दक्षिण अभिनेत्री आणि मॉडेल अनुश्रमीसोबत डेट करत असल्याचे त्यात अधिक भर पडली. मात्र, याबाबत त्यांने इन्कार केला आहे. योग्यवेळी मी लग्नाबाबत बोलेन, असे सांगून भुवीने यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही अफवा असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)