भुलेश्वर वनउद्यानात जागतिक वनदिन साजरा

माळशिरस – महाराष्ट्रात जागृत देवस्थान तसेच पुणे जिल्ह्यात शिल्प सौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागातील एक टेकडीवर भुलेश्वर महादेवाचे मंदीर आहे. याच टेकडीच्या पायथ्याला असणाऱ्या भुलेश्वर वन उद्यानात आज जागतिक वन दिन साजरा झाला. जागतिक वन दिनाचे औचित्य साधून सध्या असणारा प्रचंड उन्हाळा व त्यामुळे प्राण्यांची पाण्यासाठी होणारी वणवण याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकी जपत महादेव बोरावके मित्र परिवाराच्या वतीने वन उद्यानातील वन्य प्राणी व वृक्षांसाठी पाण्याची सोय केली. यावेळी महादेव बोरावके मित्र परिवाराचे सदस्य मारुती बोरावके यांनी भुलेश्वर वन उद्यानाचे कर्मचारी काळूराम शेंडगे याना गरजेच्या वेळी सातत्याने वन्य जीवांसाठी पाणी पुरविण्याचे आश्वासन दिले. यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी जे. डब्लू. जाधव, वनपाल सी. एम. जगताप, वनरक्षक जी. ए. पवार, माजी उपसरपंच हिरालाल यादव, माजी ग्राम पंचायत सदस्य सुनील यादव, राजेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते सतीश यादव, शरद यादव, आदिनाथ यादव, चंद्रकांत जगताप, राजेंद्र जाधव, नवनाथ ईश्वरे, दीपक माने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)