माळशिरस- पुरंदर तालुक्‍याच्या पूर्व भागात एका टेकडीवर श्री भुलेश्वर महादेवाचे प्राचीन शिवालय आहे. याच टेकडीच्या पायथ्याला पुरंदर आणि दौंड तालुक्‍यांना जोडणारा भुलेश्वर घाट आहे. भुलेश्वर मंदिर आणि टेकडी परिसरातील पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून येऊन भुलेश्वर घाटात दरवर्षी धबधबे सुरू होतात.त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी पावसाळ्यात ही एक पर्वणीच असते. मात्र, या परिसरातील घटत्या पावसाच्या प्रमाणामुळे या कोसळणाऱ्या धबधब्यांचे प्रमाण कमी झाले असून, भुलेश्वर घाटातील धबधबा मागील दोन-तीन वर्षापासून कोरडाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)