भुलेश्वर अखंड मंदिराला जलाभिषेक घालून स्वच्छता

माळशिरस ग्रामस्थांनी जपली परंपरा
माळशिरस, – महाराष्ट्रात जागृत देवस्थान व पुणे जिल्ह्यात शिल्पसौंदर्याचा खजिना म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र भुलेश्वर अखंड मंदिरास जलाभिषेक घालण्यात आला.
श्रावण महिना यात्रा काळात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या काळात भाविकांच्या पायाची धुळ, प्रसाद व गुलाल यामुळे मंदिरात दगडावर एक प्रकारचा चिकट थर जमा होतो, त्यावर माशा बसतात. यामुळे संसर्गजन्य रोगाची भिती असते, अशा प्रकारे कोणत्याही रोगाचा प्रसार होऊ नये. यासाठी श्रावण महिना यात्रेनंतर हरीतालका झाल्यानंतर माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने अखंड भुलेश्वर मंदिरास जलाभिषेक करण्याची पुर्वी पासुन परंपरा आहे.
आज, सकाळी 10 वाजता अखंड मंदिर जलाभिषेकास (धुण्यास) भाविक भक्तांनी सुरवात केली. दुपारी 12:00 वाजता माळशिरस ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. तुकाराम जाधव व गावडे यांनी भुलेश्वरास गंगाजलाने अभिषेक केला. सायंकाली 4:00 वाजेपर्यंत मंदिर धुण्याचे काम चालु होते. मंदिरातील मुख्य शिवलिंग, सभामंडप, महाकाय नंदी, बाहेरचा सभामंडप प्रदक्षिणा मार्ग पाण्याने स्वच्छ करण्यात आला. यावेळी मोहन गद्रे, महादेव यादव, राहुल गद्रे, ह.भ.प.उध्दव यादव, विलास कदम, शिवाजी गायकवाड, सुरेश जगताप, आबा जाधव, बालासो यादव, पुजारी विजय गुरव, राजेंद्र गाडेकर, मोहन गाडेकर, चिंतामणी गाडेकर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अभिषेका नंतर पुजारी राजेंद्र गाडेकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते म्हस्कु गायकवाड म्हणाले की, श्रावण यात्रेनंतर व मृग नक्षत्र येण्यापुर्वी मुसळधार पावासाच्या अपेक्षेणे अशा पध्दतीने मंदिर पाण्याने स्वच्छ करण्याची परंपरा आहे, ती जपण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)