भुताची भिती दाखवून लैंगिक अत्याचार

पिंपरी – शहरातील बाल लैंगिकअत्याचाराचे सत्र काही थांबताना दिसत नसून चिंचवड येथे एका चार वर्षाच्या मुलीवर तडीपार गुंडाने अपहरण करुन भुताची भिती दाखवत अत्याचार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी (दि. 2) उघडकीस आली.

उच्चापा लिंगाप्पा मंगळूर असे या नराधम सराईताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पीडित बालिका घरासमोर खेळत होती. आरोपीने तिला भुताची भीती दाखवून तिचे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अपहरण केले. घरापासून दूर अंतरावर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. दरम्यान मुलगी घरी परत का आली नाही म्हणून तिचे वडील पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार देण्यासाठी जात होते. मात्र तेवढ्यात पीडितेच्या आईचा फोन आला व मुलगी घरी परतल्याचे सांगितले. घरी गेल्यानंतर आई-वडिलांनी तिची विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार पालकांना सांगितले. आरोपीची ओळख ही पीडितेला पुरेशी नव्हती तिने केवळ एक नाव पालकांना सांगितले.

त्यावरून वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपास केला असता मंगरूळ हा चिंचवड परिसरातील तडीपार आरोपी असल्याचे समोर आले. पोलिसांनी तातडीने त्याला हद्दीतूनच अटक केले आहे. मंगरूळ याला डिसेंबर पर्यंत तडीपार करण्यात आले होते. मात्र या आधीही तो सुमारे चार वेळा हद्दीत दिसला होता. या चिमुकलीच्या अंगावर गंभीर जखमा असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)