भुकूममध्ये अकरावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

file photo

पुणे- मुळशी तालुक्‍यात भुकूम येथे असलेल्या एका इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

निश्‍चय आकाश गर्ग (17, सध्या रा. इन्डस इंटरनॅशनल स्कूल, आंग्रेवाडी, भुकूम, ता. मुळशी, मूळ रा. चंदीगड), असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.

निश्‍चय हा इन्डस इंटरनॅशनल स्कूल या निवासी शाळेत अकरावीत शिक्षण घेत होता. मध्यरात्री त्याने तो राहत असलेल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती गणेश आंग्रे यांनी पौड पोलिसांना दिली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू, अशी नोंद करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी गणपतराव माडगुळकर यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)