भुईमूग पिकांची खुरापणी सुरू

चिंबळी- खेड तालुक्‍यात औद्योगिक क्षेत्रात असलेल्या चिंबळी परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील घेतलेल्या भुईमूग पिकांची खुरापणी सुरू केली आहे. खेड तालुक्‍यात दक्षिण भागातील कुरूळी, चिंबळी परिसरात गेल्या एक महिन्यांपूर्वी कांदा व ज्वारीच्या पिकाची काढणी करून उन्हाळी हंगामातील भुईमूग पिकाची टोकण पध्दतीने लागवड करण्यात आली असून गेल्या चार ते पाच दिवस पासून या पिकाची खुरपणी सुरू केली आहे. या परिसरात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत असतानाही भरउन्हात भुईमूग पिकाची खुरपणी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)