भुईंज येथील शॉपीतून 59 मोबाईल लंपास

भुईंज, दि. 23 (वार्ताहर) – भुईंजच्या बाजार पेठेतील चिकणे कॉप्लेक्समधील आकाश मोबाईल शॉपीचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडुन चोरट्यांनी 3 लाख 47 हजारांचे 59 मोबाईल चोरून नेले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भुईंज येथील चिकणे कॉप्लेक्समध्ये सुरज दामोदर पोळ यांच्या मालकीची आकाश मोबाईल शॉपी आहे. ते गुरुवारी रात्री दुकान बंद करुन घराकडे गेले. सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलुप उघडलेले दिसून आले. यानंतर दुकानात शोध घेतला असता चोरट्यांनी 3 लाख 47 हजार रुपयांच्या 59 मोबाईल हँडसेटवर डल्ला मारल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची वायर कापली होती परंतु, दारात बसवलेल्या कॅमेर्‍यात पांढर् रंगाचे लहान पोते असलेला एक चोरटा कैद झाला आहे. याप्रकरणी सुरज पोळ यांनी भुईंज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे आहे. यानंतर सपोनी बाळासाहेब भरणे यांनी चोरीची माहिती वरीष्ठांना देऊन तत्काळ डॉग स्कॉट व फिंगर प्रिंट पथक पाचारण केले.
दरम्यान, सपोनी भरणे यांनी तीन वेळा बैठक घेऊन व्यापार्‍यांनी रस्त्यासह दुकानांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि रात्रगस्तीसाठी आवाहन केले होते


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
106 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
2 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
20 :cry: Sad
101 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)