भुईंजसह परिसरात मुसळधार पाऊस

भुईंज, दि. 25 (वार्ताहर) – भुईंज परिसराला मंगळवारी सायंकाळी पाच ते सहा या एक तासाच्या कालावधीत मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
सध्या परिसरात कडधान्यांची पिके काढण्यात शेतकरी व्यस्त आहे. गत आठवड्यात दुपारच्यावेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. सोमवारीदेखील दिवसभर वातावरणात चांगलाच उकाडा जाणवत होता. दुपारी आकाश काळे ढग जमा झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पावसाची शक्‍यता व्यक्त केली जात असतानाच पाच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. पावसामुळे काहीकाळ वीजपुरवठा खंडीत झाला होता. पावसाने भुईंजसह बदेवाडी, देगाव, शिरगाव, चिंधवली, पाचवड या गावांना झोडपून काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)