भीषण अपघातात 5 जण ठार

बरडजवळ दुर्घटना


मृतांमध्ये 3 चिमुरड्यांचा समावेश

फलटण- पुणे-पंढरपूर महामार्गावर बरड गावच्या हद्दीत भरधाव वेगात निघालेली कार झाडास धडकून झालेल्या भीषण अपघातात तीन लहान मुलांसह पाचजण जागीच ठार झाले असून चारजण जखमी झालेले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूरहून पुणेच्या दिशेने चाललेली असेंट कार (एमएच 14 बीसी-9480) दुपारी साडेबाराच्या दरम्यान बरड गावच्या हद्दीमध्ये आल्यानंतर चालकाचा गाडीवरुन ताबा सुटून कार रस्त्यालगत असणाऱ्या झाडाला जोरदार धडकली.

या गाडीमध्ये 9 प्रवासी प्रवास करीत होते. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीचे इंजिन ड्रायव्हरसीटपर्यंत मागे आले होते. या अपघातामध्ये एक नऊ वर्षाची मुलगी, 7 ते 8 वर्षे वयाचा मुलगा व चालक व अन्य दोघे असे पाचजण जागीच ठार झाले आहेत. तसेच गाडीतील इतर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ फलटण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्यामुळे पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली आहे. पाचजणांची बसण्याची क्षमता असलेल्या या गाडीमध्ये सुमारे नऊजण दाटीवाटीने बसविले असल्यामुळे हा अपघात झाला असण्याबाबतची शक्‍यता नाकारता येत नाही. अपघातस्थळी रक्ताचा अक्षरश: सडा पडलेला होता. याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड करत आहेत.

-Ads-

तुकाराम छगन नामदास मुळ गाव रा.कारुंङे ता. माळसिरस जि. सोलापूर येथील असून सध्या देहुरोङ येथे कामानिमित्त स्थायिक आहेत. त्यांच्या मेहुण्याचे लग्नाला ते दिनांक 24 रोजीच साठेफाटा ता. फलटण येथे आले होते. त्यानंतर ते आपल्या गावी कारुंङे येथें आले होते.त्यांच्या बरोबर पत्नी नंदा तुकाराम नामदास,मुलगी सानिका व मुलगा सिद्धेश होता. तसेच त्यांच्या शेजारी राहणाऱ्या जरीना यासीन शेख या आपल्या दोन मुली साबरीन व हीना व मुलगा आयान पुतणी नरगीससह लग्नासाठी आल्या होत्या.हे सर्व 9 जण नामदास यांच्या स्वतःच्या असेंट कार मधून आले होते. तुकाराम नामदास च गाङी चालवीत होते.

लग्न व सर्व कार्यक्रम उरकून ते परत देहुरोङ येथे चालले असताना हा भीषण अपघात घङला या अपघातात तुकाराम नामदास वय 38,नंदा नामदास वय 35 ,सानिका वय 12 ,सिद्धेश वय 10 व हिना यासीन शेख वय 9 हे जागीच ठार झाले .यातील जरीना यासिन शेख व आयान यासिन शेख हे दोघे मायलेकर गंभीर जखमी आहेत तर साबरीन यासिन शेख व नरगीस हफिज शेख या दोघी जखमी आहेत या सर्वांवर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात उपचार सुरु आहेत या भीषण अपघातात नामदास यांचे संपूर्ण कुटुंबच ठार झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)