भीषण अपघातात महिला ठार

भुईंज, दि. 2 (वार्ताहर)
ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर भुईंजनजीक असलेल्या बदेवाडी गावाजवळ एका महिलेला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात महिला जागीच ठार झाली. हा अपघात मंगळवारी रात्री उशीरा घडला. दरम्यान, अपघातातील महिले ओळख पटलेली नाही.
मंगळवारी रात्री उशीरा एक महिला बदेवाडी येथील उड्डाणपुलावरून निघाली होती. यावेळी एका अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. वाहनाच्या धडकेत ती महिला पुलाच्या दुभाजकावर जोरदार आदळली. या अपघातात महिलेला गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळतास भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मुंगसे व त्यांच्या सहकारी प्राची सपकाळ अपघातस्थळी गेले. त्यांनी तात्काळ ऍम्ब्युलन्स बोलावून अपघातग्रस्त महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्‍टरांनी महिलेचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. दरम्यान, भुईंज पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला असून महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)