भीषण अपघातात मसूरचा युवक ठार

मसूर, दि. 14 (प्रतिनिधी) – कराड रस्त्यावरील शोभराज ढाबा येथे ट्रॅक्टरला मागून दुचाकी जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात मसूर येथील युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. संजय बजरंग लोकरे (वय 45 वर्षे) रा. मसूर असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मसूर, ता. कराड येथील संजय बजरंग लोकरे (वय 45 वर्षे) हे त्यांच्या सासरवाडी कार्वेनाका येथून मसूरला येत असताना शोभराज ढाब्याजवळ उभा असलेल्या टॅ्रक्टरला मोटरसायकल (क्र. एम. एच. 11 ए. जी. 2932) ची मागून जोरदार धडक बसली. या अपघातात लोकरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांच्यावर वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक मुलगा असा परिवार आहे. अपघाताची नोंद कोठेही झालेले नाही. अपघाताची माहिती कळताच मसूर मधील मातंगवस्तीमधील युवक मोठ्या प्रमाणात घटनास्थळी जमा झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)