भीषण अपघातात पोलीस अधिकारी ठार

उडतारे येथील घटना : दोनजण गंभीर, कारचा चक्काचूर

भुईंज – ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर उडतारे गावच्या हद्दीत कारचा पुढचा टायर फुटूल्याने मागील बाजुचे चाक निसटून भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून चालक जागीच ठार झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान मृत चालक सचिन प्रताप शिंदे हे पाटखळ येथील असून बीड पोलीस दलामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने पोलीस खात्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पाठखळ या गावावर शोककळा पसरली आहे.

अधिक माहिती अशी, पाटखळ (ता. सातारा) येथील सचिन प्रताप शिंदे, सागर प्रताप शिंदे, विशाल नारायण शिंदे हे पुण्यातून साताऱ्याच्या दिशेने रिटस्‌ या चारचाकी कारने साताऱ्याकडे निघाले होते. शिंदे यांची कार महार्गावरील उडतारे गावच्या हद्दीत आली असताना सचिन शिंदे यांचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार फरफटत जाऊन दुभाजकला धडकली. कार दुभाजकाला धडकाच कारचा पुढचा टायर फुटून पाठीमागचे चाक निसटून कार पलटी झाली. या भीषण अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला असून चालक सचिन शिंदे यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टायर फुटल्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी अपघाताची दाहकता लक्षात घेऊन जखमींना तात्काळ कारमधून बाहेर काढले. जखमींना तात्काळ सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे. सचिन शिंदे हे बीड येथे पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत होते. अधिक तपास पोलीस हवालदार बाबर करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)