भुईंज, दि. 4 (वार्ताहर) -पुणे सातारा महामार्गावरील पाचवडच्या उड्डाण पुलावर माल ट्रकला पाठीमागुन जोराची धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाले. अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे
पाचवड, ता. वाई गावच्या हद्दीतील उड्डाण पुलावर माल ट्रक आला असता पाठीमागुन भरघाव वेगाने येणार्‍या काल चालकाचा ताबा सुटल्याने कार माल ट्रकखाली घुसली. या अपघातात चालक सतीश शंकर पवार (वय 39) राहणार गोटे, ता. कराड आणि वनीता सुभाष मोरे (वय 35, रा. आगाशिवनगर, कराड) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
दोघांनाही सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची तक्रार माल ट्रक चालक लतीफसाहब वजीर शेख (वय 38, रा. कराड) याने भुईंज पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास हवलदार मुंगसे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)