भीषण अपघातात तीन महाविद्यालयीन तरुण ठार

 

भरधाव कारच्या धडकेने दुचाकीवरील तीन महाविद्यालयीन विद्यार्थी मृत्यूमुखी पडल्याची घटना भूगाव रस्त्यावर शनिवारी मध्यरात्री घडली. या अपघातात त्यांचा आणखी एक मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुणाल शर्मा (18, रा. विमाननगर), मानस उपाध्याय (18, रा. न्याती एम्पायर, खराडी), शुभम मदार (18) अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. तर यात ध्रुव बिष्णोई हा जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अमरनाथ सिंग राजेश सिंग (वय 18, रा. मुंढवा रस्ता, खराडी) याने यासंदर्भात हिंजवडी पोलिसां फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटारचालक दर्शन विजय जमदाडे (25, रा. शिंदे पेट्रोल पंपाजवळ, बावधन) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानस, कुणाल, ध्रुव, शुभम आणि अमरनाथ सिंग हे मित्र आहेत. ते पुण्यात शिक्षणासाठी आले असून खराडी येथील एका महाविद्यालयात बीबीएच्या प्रथम वर्षात शिकत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास सर्वजण भूगांव येथील कॅफे सीओ या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी निघाले होते. मानस, कुणाल, ध्रुव, शुभम आणि अमरनाथ सिंग वेगवेगळ्या दुचाकीवर होते. भूगाव रस्त्यावर हॉटेल वुडस्समोर भरधाव मोटारीने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी झालेल्या मानस, कुणाल, धुव्र, शुभम यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी मानस आणि कुणालचा मृत्यू झाला होता. तर शुभमचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी हा बावधान येथे मार्केटिंगचा व्यवसाय करतो. त्याची होंडा ऍकॉर्ड कार होती. तोही रात्री जेवण करून भूगाव येथून चांदणीचौकाकडे चालला होता. तो इतर भरधाव होता, की त्याने समोरील तिन्ही दुचाकींना धडक दिली. याप्रकरणाचा तपास हिंजवडी ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद पगारे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)