भीषण अपघातात चौघे जखमी

भुईंज – पुणे-सातारा महामार्गावरील भुईजच्या कृष्णा नदी पुलावर कार आणि दुचाकीच्या धडकेत तीन गंभीर तर एक किरकोळ जखमी झाल्याची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावरुन साताऱ्याकडे सुसाट वेगाने जाणारी इंडिका कार क्र. एमएच 06 एम 5992 हिने समोरुन विरुध्द दिशेने ट्रिपल सीट येणारी दुचाकी क्र. एमएच 11 क्‍यु 5847 ला भुईज गावच्या हद्दीतील कृष्णा पुलावर जोराची धडक दिल्याने त्यावरील तिघेही आणि कारमधील एक असे चौघेजण गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींची नावे समजू शकली नाहीत. या अपघाताची नोंद भुईज पोलिस ठाण्यात झाली आहे. याचा अधिक तपास सपोनि बाळासाहेब भरणे आणि हवालदार धायगुडे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)