भीषण अपघातात एक ठार, तीन जखमी

भुईंज- ग्वाल्हेर बंगळूर आशियाई महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला आहे. तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातात एका गरोदर महिलेचा समावेश असून जखमींना सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वेळे, ता. वाई गावच्या हद्दीत नादुरुस्त झालेला ट्रक शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास महामार्गावर उभा होता. यावेळी पाठीमागून आलेल्या इर्टिगा कारमधील चालक भरत रामेश्‍वर खरात (वय 26) यांचा कारवरील ताबा सुटल्याने कार पाठीमागून जाऊन ट्रकवर आदळली. यावेळी कारच्या क्‍लिनर बाजूला बसलेले बशीर हुसेन मनसुरी (वय 48) हे जागीच ठार झाले तर आरफीन बशीर मनसुरी (वय 23), अफसाना बशीर मनसुरी (वय 38), तमरीन बशीर मनसुरी (वय 22), लहान मुलगी आयाशा बशीर मनसुरी (वय 6) (सर्वजण रा. दिवा, मुंबई) हे सर्वजण इर्टिगा कारने मुंबईकडे निघाले होते. यावेळी भरत रामेश्‍वर खरात (वय 26) हे गंभीर जखमी झाली आहेत.

अपघाताची नोंद भुईंज पोलीस पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, चालक खरात याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अपघातील मृत मनसुरी व जखमी हे पायधुनी, मुंबई येथील राहणारे आहेत. तर चालक दिवा (मुंबई) येथील आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)