भीम फेस्टीव्हल आणि भीम गीतांनी भोर शहर दुमदुमले

भोर- भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील विविध सामाजिक संस्था, शासकीय, प्रशासकीय अधिकारी, भोर नगरपालिका, भोर तालुका पंचायत समिती आणि हजारो भीमप्रेमी नागरिकांनी एस. टी. स्टॅण्ड जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी केली.
यावेळी भोर तालुका आरपीआय, भारातीय बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासभा, शाहु-फुले-आंबेडकर विचार प्रसारक मंडळ, भीम आर्मी या इतर राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, भोरच्या उपविभागिय अधिकारी मोसमी बर्डे (चौगुले), भोरच्या तहसीलदार वर्षा शिंगण पाटील, नायब तहसीलदार बबनराव तडवी, हेमंत नायकवाडी, भोर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, नगराध्यक्ष तानाजी तारू, माजी नगराध्यक्षा ऍड. जयश्री शिंदे, भोर तालुका पंचायत समितीच्या सभापती मंगल बोडके, उपसभापती लहुनाना शेलार, सामाजिक कार्यकर्त्या सीमा तनपुरे, सरपंच रेखा टापरे, बार्टीच्या सुनंदा गायकवाड, शशिकला माने, प्रा. सुजाता भालेराव, नगरसेवक यशवंत डाळ, प्रा. डॉ. रोहिदास जाधव, महेंद्र साळुंके, दीपक गायकवाड, रवींद्र कांबळे, किरण रणखांबे, राजन घोडेस्वार, मनोहर मोरे, नगरसेवक गजानन दानवले, अशोक शिंदे आदी मान्यवारांचा समावेश होता.

  • भीमगीते, कविता आणि व्याख्याने
    जयंतीनिमित्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने तीन दिवसीय भीम फेस्टिव्हल, भीमगीत गायन, विचारांचा महोत्सव, देश आमचा देह आहे… या महाराष्ट्रातील कवींचा कविता गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून भीम गीतांनी भोर शहर आणि परिसर दुमदुमला आहे. भीम फेस्टिव्हलचे उद्‌घाटन आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते करण्यात आले, तर विचारांच्या महोत्सवात डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि समता परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्य या विषयावार व्याख्यान रविवारी (दि. 15) होणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)