भीम ऍप वाढीसाठी चालना 

नवी दिल्ली – प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या वापरकर्त्यांना सवलती पाहता सरकारने भीम ऍपच्या वापरकर्त्यांना त्याचप्रमाणे सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. 14 एप्रिलपासून सरकारकडून 900 कोटी रुपयांचा कॅशबॅक आणि अन्य भत्ते जाहीर करण्यात येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर 2016 मध्ये भीप ऍप सादर केले. यानंतर फोनपे, गुगल तेझ, पेटीएम यासारख्या कंपन्यांनी यूपीआयचा आधार घेतला आहे. या खासगी कंपन्यांकडून कॅशबॅकसारख्या सुविधा देण्यात आल्याने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये यूपीआय व्यवहारांत भीमचा हिस्सा 40.5 टक्‍क्‍यांवरून फेब्रुवारीमध्ये 5.75 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला. रोख रकमेचा वापर घटावा आणि ऑनलाइन व्यवहारांची संख्या वाढावी यासाठी सरकारकडून कॅशबॅक आणि अन्य भत्त्यांची सेवा देण्यात येईल.

भीम ऍपवरून पहिल्यांदा किमान 100 रुपयांचे हस्तांतर करण्यात आल्यास 51 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येईल. यानंतर पुढील 25 व्यवहारांसाठी 25 रुपयांपर्यंत कॅशबॅक देण्यात येईल. यानंतरच्या 25 ते 50 दरम्यानच्या व्यवहारांसाठी एकूण 100 रुपये आणि 50 ते 100 व्यवहारांसाठी एकूण 200 रुपयांचा कॅशबॅक देण्यात येईल. 250 पेक्षा अधिक रुपयांचा 100 व्या व्यवहारानंतर हस्तांतरण करण्यात आल्यास 10 रुपये देण्यात येतील. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी डेबिट कार्ड, भीम यूपीआय यांवरून जानेवारी 2018 पासून 2000 रुपयांपर्यंतचे व्यवहार केल्यास सरकारकडून एमडीआर शुल्क भरण्यात येईल. देशातील मोबाइलधारक नागरिकांनी शक्‍य तितक्‍या जास्त प्रमाणात डिजिटल व्यवहार करावेत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)