भीम ऍपला दहा हजार रुपये ग्राहकाला परत देण्याचा ग्राहक मंचाचा आदेश

पाठविलेल्या खात्यातून पैसे गेले : मात्र, दुसऱ्या खात्यात जमाच नाही


नुकसानभरपाईपोटी पाच हजार आणि तक्रार अर्जाचा खर्च म्हणून 3 हजार रुपये देण्यात यावेत

पुणे – भीम ऍपद्वारे कॉर्पोरेशन बॅंकेतून ऑनलाईन आयडीबीआय बॅंकेत वर्ग करुनही 10 हजार रुपये जमा न झालेल्या ग्राहकाला ग्राहकाच्या बाजूने ग्राहक मंचाने निकाल दिला आहे. ऍपमधील त्रुटीमुळे रक्कम जमा झाली नसल्याचे निरीक्षण नोंदवत ग्राहकाला दहा हजार रुपये परत देण्याचा आदेश जिल्हा ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष एम. के. वालचाळे, सदस्य शुभांगी दुनाखे, एस. के. पाचरणे यांनी दिला आहे. याबरोबरच नुकसानभरपाईपोटी पाच हजार रूपये आणि तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रूपये देण्यात यावेत, असेही मंचाने आदेशात नमुद केले आहे.
छोटेलाल प्रसाद ( रा. शिरुर) यांनी ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. त्यांनी नोडल ऑफिसर, भीम ऍप, नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, द कॅपिटल, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्‍स, बांद्रा, कॉर्पोरेशन बॅंक घोडनदी शाखा, शिरुर यांच्याविरुद्ध दावा दाखल केला होता.
भीम ऍपद्वारे देशभरात एका अकाऊंटवरुन दुसऱ्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. हे ऍप्लिकेशन मोबाइल बॅंकिंगवर आधारित आहे. तक्रारदाराचे कॉर्पोरेशन बॅंकेत खाते होते. तक्रारदाराने या बॅंकेच्या शिरुरमधील खात्यातून दहा हजार रुपये आयडीबीआय बॅंकेच्या खात्यात वर्ग केले होते. सात ऑगस्ट 2017 रोजी त्यांनी हे पैसे वर्ग केले होते. तक्रारदाराला त्याबाबतची रिसीट भीम ऍप्लिकेशनद्वारे मिळाली होती. मात्र तक्रारदाराच्या लक्षात आले की, आयडीबीआय बॅंकेच्या खात्यात दहा हजार रुपये जमा झालेले नाहीत. कॉर्पोरेशन बॅंकेच्या खात्यातून दहा हजार रुपये काढण्यात आल्याचे दाख्विण्यात येत असले तरी ती रक्कम दुसऱ्या खात्यात जमा झालेली नव्हती.
चौकशी केल्यावर आयडीबीआय बॅंकेने तक्रारदाराला एसएमएस पाठविला. तक्रारदाराच्या खात्यासाठी त्या बॅंकेत युपीआय सर्व्हिसची (युनिफाइड पेमेंट सर्व्हिस) परवानगी देण्यात आलेली नाही, असे आयडीबीआय बॅंकेने कळविले. त्यानंतर तक्रारदार परत कॉर्पोरेशन बॅंकेकडे गेले. त्यांना पाठविण्यात आलेल्या एसएमएस मध्ये दहा हजार रुपये तक्रारदाराच्या एसबीआय बॅंकेच्या खात्यात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तक्रारदारानुसार त्यांच्या एसबीआयच्या खात्या दहा हजार रुपये जमा झाल्याची नोंदच नव्हती. याप्रकरणी कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे तक्रारदाराने नोटीस पाठविली. भीम ऍपच्या नोडल ऑफिसर तर्फे सादर करण्यात आलेल्या लेखी जबाबात तक्रारदार हे त्यांचे ग्राहक नसल्याचे सांगण्यात आले. इलेक्‍ट्रॉनिक पेमेंट सिस्टीम सर्व्हिस प्रोव्हायडर असून रिझर्व बॅंकेकडून त्यांना अधिकृत मान्यता देण्यात आलेली आहे. तक्रारदाराने युपीआयडी ऑप्शन वापरण्याऐवजी मोबाइल नंबर किंवा अकाऊंट नंबर जो एसबीआयला लिंक करण्यात आला होता, तो वापरला त्यावर पैसे जमा करण्यात आले. तक्रारदाराने एसबीआय बॅंकेचा पर्याय निवडला म्हणून त्यावर पैसे जमा झाले. भीम ऍप जबाबदार नाही, असे उत्तर दिले.
भीम ऍप हे सर्व्हिस देणारे आहेत हे त्यांनी लेखी जबाबात मान्य केले. त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होतात. रक्कम कोठे गेली हे सांगण्यातच आले नाही. यावरुन लक्षात येते की या ऍपमध्ये त्रुटी आहे. तक्रारदाराच्या कॉर्पोरेशन बॅंकेतून दहा हजार रुपये वजा करण्यात आले. मात्र, ते इतर कोणत्याही बॅंकेत जमा करण्यात आले नाही ही त्रुटी आहे. याम्‌ुळे तक्रारदाराचे नुकसान झाले. नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. तक्रारदाराला दहा हजार रुपये देण्यात यावेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)