भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखरची कारागृहातून मुक्‍तता

लखनौ – भीम आर्मीचा संस्थापक आणि उत्तर प्रदेशातील सहारनपूरच्या दंगलीतील मुख्य आरोपी चंद्रशेखर आझाद उर्फ रावणची अखेर कारागृहातून मुक्‍तता करण्यात आली आहे. रात्री अडीचच्या सुमारास रावणला कारागृहातून सोडण्यात आले. योगी सरकारने बुधवारीच रावणला सोडण्याचा आदेश दिला होता.

सहारनपूरमध्ये मे 2017 मधील जातीय दंगल भडकावण्याच्या आरोपात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (रासुका) बेड्या ठोकल्या होत्या. चंद्रशेखर 16 महिने कारागृहात होता. चंद्रशेखरच्या सुटकेच्या वेळी त्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सहारनपूरच्या जेलमधून बाहेर येताच चंद्रशेखर रावणने सभेला संबोधित केले. यावेळी त्याने भाजपवर जोरदार निशाणा साधला. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करायचे आहे. भाजप सत्तेतच नाही तर विरोधी पक्षामध्येही येणार नाही. भाजपला सत्तेतून उखडून टाकू, अशी घोषणा चंद्रशेखर रावणने केली.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील योगी सरकारने बुधवारी त्याच्या सुटकेचे आदेश दिले होते. सरकारने निर्धारित वेळेच्या दोन महिने आधीच चंद्रशेखर रावणची सुटका करण्याचा निर्णय घेतला. सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, “रावणच्या आईच्या विनंतीवर सहानुभूतीने विचार करुन वेळेआधीच त्याच्या सुटकेचा निर्णय घेतला आहे.”

चंद्रशेखर रावणला नियमानुसार 1 नोव्हेंबर 2018 पर्यंत जेलमध्ये राहायचे होते. पण गुरुवारी रात्रीच त्याला सोडण्यात आले. रावणशिवाय सोनू पुत्र नाथीराम आणि शिवकुमार पुत्र रामदास या दोन आरोपींचीही सुटका करण्याचा निर्णय सरकारने घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)