भीम अॅपवर उद्यापासून मिळणार कॅशबॅक ऑफर

नवी दिल्ली :  डिजिटल व्यवहार करण्यासाठी जर तुम्ही सरकारने सुरु केलेले भीम अॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भीम अॅप वापरणा-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त उद्यापासून  कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करण्यात आलेल्या या भीम अॅपच्या माध्यमातून कॅशबॅकच्या अनेक योजनांचा फायदा ग्राहकांना होणार आहे.

भीम अॅपच्या कॅशबॅक ऑफरमधून ग्राहकांना एका महिन्याला 750 रुपये आणि व्यावसायिकांना 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो. भारत सरकारच्या भीम(BHIM) म्हणजे Bharat Interface For Money अॅप नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NPCI) मार्फत चालविण्यात येते.

-Ads-

ऑनलाइन पेमेंट अॅप म्हणून भीम अॅप भारतातले सर्वात प्रसिद्ध अँड्रॉईड अॅप ठरले आहे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘डिजिधन मेला’मध्ये भीम हे आधार संलग्न मोबाईल पेमेंट अॅप लाँच केले होते. लाँचिंगच्या तीनच दिवसात भारतात गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप अव्वल ठरले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)