भीमा सहकारी”ने शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी

यवत- भीमा सहकारी साखर कारखाना (पाटस, ता. दौंड) यांनी ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त 50 किलो साखर 20 रुपये प्रति किलो या दराने द्यावी, कामगारांना दिवाळीत पगारासह बोनस मिळावा, शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम दिवाळीत मिळावी, चालू वर्षी उसाचे 3 हजार रुपये प्रमाणे बील द्यावे, अशी मागणी दौंड तालुका भाजपचे अध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे यांनी केली आहे. याकारखान्याची सभासद संख्या सुमारे 50 हजार आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून सभासदांना साखर मिळत नाही. भीमा पाटस कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना किमान दिवाळीला तरी अल्प दरात साखर मिळावी, अशी मागणी केली होती; परंतु कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी याबाबत कोणतीच घोषणा केली नाही. ऐन दिवाळीच्या सणाला कारखान्याकडून शेअर्सधारक सभासदांना अल्प दरात साखर मिळणार नसल्याने सभासदांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)