केडगाव- अज्ञाताने एका महिलेचा गळा दाबून खून करुन तिचा मृतदेह पोत्यात भरून भीमा नदीपात्रात फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यामुळे हा खून कोणी आणि कशासाठी केला? याचा तपास यवत पोलीस करीत आहेत. याबाबत यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दौंड तालुक्‍यातील पारगाव गावातील भीमा नदीच्या कडेला शिवरकर यांच्या मोटारीजवळ दि. 12 सप्टेंबर बुधवारी रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी एका 25 ते 30 वर्षाच्या महिलेचा गळा दाबून खून करुन तिचा मृतदेह पोत्यात भरून पोत्याचे तोंड दोरीने बांधल्याच्या स्थितीत आढळून आला आहे. मृत महिलेच्या अंगावर पोपटी टॉप, पांढरा कुर्ता हातात पिवळ्या कचाकड्याच्या बांगड्या आणि पायात जोडवी आहे. अशा वर्णनाच्या महिलेच्या संदर्भात कोणाला माहीत असल्यास त्यांनी खालील मोबाईल आणि फोन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन यवत पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)