भीमा नदी पात्रातील वाळू चोरांची नावे गायब?

10 जणांवर गुन्हा दाखल : दौंड महसुलाच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

राजेगाव – नायगाव (ता. दौंड) येथील भीमा नदी पात्रातून वाळूचोरी केल्याप्रकरणी 10 जणांवर वाळूचोरीचे गुन्हे दाखल झाले असून हे गुन्हे दाखल होण्यास प्रदीर्घ काळ लागल्यामुळे त्यातील काही आरोपींच्या नावाची गायब चर्चा आहे. तसेच मागील तीन दिवसांपूर्वी शिरापूर येथील वाळू चोरी प्रकरणी चोरी गेलेल्या वाळूची किंमत सहा हजार रुपये प्रतिब्रास प्रमाणे, तर नायगाव येथील भीमानदी पात्रातून चोरी गेलेल्या वाळूची किंमत तीन हजार रुपये प्रतिब्रास प्रमाणे महसूल विभागाने लावल्यामुळे व काही वाळूचोरांची नावे वगळल्यामुळे दौंड महसुलाच्या कारभाराबाबत शंका उपस्थित होत आहे.

महेश कोकरे, रसिक पाटील (दोघे रा. टाकळी ता. करमाळा जि. सोलापूर), शंकर कवडे (रा. कात्रज ता. करमाळा जि. सोलापूर), भारत बंडगर, नंदू बंडगर (दोघे रा. बंडगरवाडी ता. इंदापूर), संदीप काळे (रा. शिरापूर, ता. दौंड), दत्ता गायकवाड (रा. जिंती ता. करमाळा जि. सोलापूर), पप्पू गायकवाड (रा. बाभूळगाव, ता. कर्जत जि. नगर), बाळू गायकवाड, संजय देवकाते (दोघे रा. मदनवाडी, ता. इंदापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहेत. तर याबाबत नायगावचे तलाठी दीपक पांढरपट्टे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबतची माहिती अशी की, नायगावचे तलाठी दीपक पांढरपट्टे , मंडलाधिकारी मंगेश नेवसे व कोतवाल रोहिदास कांबळे हे भीमानदीपत्रकडे गेले असता उजनी संपादित गट नं. 99 मधून वेगवेगळ्या ठिकाणी वाळू उपसा करून त्याचा वाळूसाठा वेगवेगळ्या ठिकाणी केलेला आढळला. त्याचे मोजमाप केले असता अंदाजे 165 ब्रास वाळूचा अनधिकृत साठा केल्याचे त्यांना आढळून आले. त्यानंतर त्यांनी अधिक चौकशी केली असता वरील आरोपींनी बोटींच्या सहाय्याने 165 ब्रास वाळू प्रतिब्रास 3 हजार रुपयांप्रमाणे 4 लाख 95 हजार रुपयांची शासकीय वाळू बेकायदेशीर उत्खनन केल्याने या दहा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक एस. के. बोराडे करीत असल्याची माहिती ठाणे अंमलदार ओमासे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)