भीमा नदी पाण्याचा प्रश्‍न आठ दिवसांत सोडवा

वासुदेव काळे ः देऊळगावराजे येथे पाटबंधारे खात्याला सूचना

देऊळगांव राजे- येथील भीमा नदीतील पाण्याचा प्रश्न आठ दिवसात सोडवून परिसरातील शेतकऱ्यांना योग्य न्याय दिला जाईल, असे आश्वासन भाजपचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे यांनी दिले, ते देऊळगाव राजे (ता. दौंड) येथील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांशी बोलत होते.
भामा आसखेड धरणाचे पाणी तालुक्‍यातील बंधारे भरून घेण्यासाठी सोडले होते; पण बंधारे भरून घेताना टेल टू हेड भरून घेण्याचे अपेक्षित असताना पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ नियोजनामुळे बंधारे हेड टू टेल भरले गेले, त्यामुळे देऊळगावाच्या बंधाऱ्यात पाणीच आले नाही. पर्यायाने या परिसरातील जनावरांच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. या पाश्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांनी वासुदेव काळे यांची भेट घेऊन पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता सांगितली. यावेळी काळे यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी त्वरित दूरध्वनीवरून संपर्क करून येथील पाणी प्रश्न आठ दिवसात सोडवा, अशा सूचना दिल्या.
याबरोबरच दौंड-सिद्धटेक रस्त्याचेचे काम अष्टविनायक मार्गात होणार आहे; पण सध्या या रस्त्यावर खूप खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजवण्याचे काम देखील पुढील तीन-चार दिवसात सुरू होईल, असे आश्वासन काळे यांनी यावेळी नागरिकांना दिले. या वेळी तुकाराम आवचर, अमर शेळके, गणेश आवचर, केशव काळे, तात्या शेळके, सतीश आवचर, राजेंद्र काटकर, राजेंद्र बुऱ्हाडे, पंकज बुऱ्हाडे, राहुल आवचर, मदन खेडकर आणि परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते, परिसरातील ही महत्वाची दोन्ही कामे मार्गी लागणार असल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)