भीमा नदीवर केटी बांधणार

अतुल देशमुख : वांजळे, धुवोली, मोरेशी शिरगावचा पाणी प्रश्‍न मिटणार

राजगुरूनगर- खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील वांजळे, धुवोली, मोरोशी, शिरगाव परीसरातील पाणी टंचाई दूर करण्यासासाठी भीमा नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन नायफड-वाशेरे जिल्हा परिषद गटाचे सदस्य अतुल देशमुख यांनी केले.
संयुक्‍त ग्रामपंचायत धुवोली-वांजाळे ग्रामपंचायतअंतर्गत दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत धुवोली येथील दलितवस्तीमधील रत्याच्या सिमेंट कॉंक्रिटीकरण कामासाठी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्या प्रयत्नातून समाजकल्याण विभागाकाकडून 12 लाख, वांजाळे येथे दफनभूमी शेडसाठी 5 लाख 60 हजार, वांजाळे येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग निधीअंतर्गत श्री काळभैरवनाथ मंदिर सुशोभीकरण कामासाठी 3 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खेड पंचायत समितीचे उपसभापती भगवान पोखरकर, संयुक्‍त ग्रामपंचायत धुवोली वांजाळे सरपंच शैला वाघ, उपसरपंच शरद जठार, पांडुरंग जठार, सुनील सोळसे, तंटामुक्‍त समिती अध्यक्ष विठ्ठल सोळसे, बबाबाई जठार, ग्रामसेवक राजाराम रणपिसे, जिजाबा जठार, संतोष थोरात, महादू थोरात, सचिन थोरात आदींसह धुवोली-वांजळे गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान चास कमान धरणाचा पाणीसाठा खाली गेल्यानंतर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तीव्र सामना दरवर्षी करावा लागतो. धुवोली, वांजळे, मोरोशी धामणगाव खुर्द, शिरगाव गावातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी भीमा नदीवर बंधारे बांधण्याची मागणी गेली कित्येक वर्षे करीत आहेत. मात्र, याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच शरद जठार, सूत्रसंचालन माजी सरपंच पांडुरंग जठार, ग्रामसेवक राजाराम रणपिसे यांनी आभार मानले


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)