भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण: गौतम नवलखा, प्रा. तेलतुंबडे यांना तूर्त दिलासा 

14 डिसेंबरपर्यत कारवाई करू नका – हायकोर्ट 

मुंबई: भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवादी असल्याच्या दावा करून माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा, स्टॅन स्वामी आणि प्रा. आनंद तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाने तूर्त दिलासा दिला आहे. नवलखा यांना अटक करु नये, असे आदेश देताना आनंद तेलतुंबडे आणि स्टॅन स्वामी यांच्याविरोधातही तोपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करू नका, असे निर्देश न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत.

-Ads-

यावेळी राज्य सरकारने नवलखा यांच्या याचिकेला जोरदार विरोध केला. याप्रकरणी सरकारकडे सबळ पुरावे असल्याचा दावा करताना सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी 3 डिसेंबरला सुनावणी असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. याची दखल न्यायालयाने घेतली. मात्र आम्हाला तोंडी नको, त्या संदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करा, असे निर्देश राज्य सरकारला देताना 14 डिसेबरपर्यंत पुणे पोलिसांनी कोणावरही कारवाई करू नये, असे स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)