भीमा-कोरेगाव हिंसाचार : नक्षलवाद्यांशी संबंधाप्रकरणी दिग्विजय सिंह यांची चौकशीची शक्यता

पुणे – भीमा-कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याशी जोडलेले पुणे पोलिसांना आढळले आहेत. यामुळे आता दिग्विजय सिंह यांचीही पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांशी संबंधांच्या संशयावरून जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या रोना विल्सन यांना मोस्ट वॉंटेड नक्षली नेता मिलिंद टेल्टुम्ब्डे पत्र लिहले होते. या पत्रात म्हंटले होते कि, आंदोलनाला काँग्रेस नेते मदत करायला तयार आहेत. या पत्रात एक नंबरदेखील लिहिण्यात आला होता. हा नंबर दिग्विजय सिंह यांचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

-Ads-

दरम्यान, याआधीही भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर नक्षल्यांशी संबंध असल्याचा आरोप लावला होता. यावेळी दिग्विजय सिंह यांनी सरकारमध्ये हिंमत असेल तर मला अटक करा, असे आव्हान दिले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)