भीमा कोरेगाव प्रकरण ; मिलिंद एकबोटेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पुणे : भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटकेत असलेले हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांना पुण्यातील सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर हे आदेश देण्यात आले.

भीमा कोरेगाव येथील दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना तीन दिवसांपूर्वी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना २१ मार्चपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती. ही कोठडी संपल्यानंतर बुधावारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयाने एकबोटेंना १४ दिवसांची न्यायालायीन कोठडी सुनावली.

एकबोटेंना तीन दिवसापूर्वी न्यायालय परिसरात एका तरुणाने काळे फासण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर एकबोटे यांच्या समर्थकांनी काही काळ न्यायालयाच्या आवारात गोंधळ घातला. तसेच काही जणांनी मिलिंद एकबोटेंवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. यापार्श्वभूमीवर आज न्यायालय परिसरात चोख  सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)