भीमा-कोरेगाव प्रकरण : कागदपत्रांची प्रत मिळण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र

हर्षाली पोतदार यांच्याकडून अर्ज

पुणे – भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाकडे जमा होणारी कागदपत्रांची प्रत खटल्याचा कामकाजासाठी मिळावी, अशी मागणी हर्षाली विनायक पोतदार यांनी आयोगाकडे केली आहे. त्या एल्गार परिषदेच्या आयोजनाच्या मदतनीस आहेत. त्यांनी अॅड. रोहन नहार यांच्यामार्फत हा अर्ज केला आहे.

-Ads-

आयोगाच्या कामकाजाला बुधवारी सुरुवात झाली. तसेच 6 ऑक्‍टोबरपर्यंत 17 व्यक्तींची साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. मात्र, त्यास जास्त अवधी लागत असल्याने या कामकाजास मुदतवाढ देण्याचीही शक्‍यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेली प्रमाणपत्रे, दाखल प्रकरणांची सध्यस्थिती काय आहे. याची कागदपत्रे, दोषारोपपत्र, एफआयआर, पंचनाम्याची कॉपी, फोटो आणि व्हिडीओची सॉफ्ट कॉपी, शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केस डायरी, वायरलेसद्वारे मिळालेले मॅसेज, 28 डिसेंबर 2017 ते 3 जानेवारी 2018 दरम्यान शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चौकींमध्ये खबरदारीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती द्यावी, याकाळात एसआयटीने दिलेला रिपोर्टची प्रत द्यावी, अशी मागणी केली आहे. कोलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या द्विसदस्यीय आयोगाकडून ही चौकशी सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)