भीमा-कोरेगाव प्रकरण : एकाची साक्ष नोंदवली

संग्रहित छायाचित्र

द्विसदस्यीय आयोगापुढे सुनावणी सुरू

पुणे – भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराची सुनावणी बुधवारपासून कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमीत मलिक यांच्या द्विसदस्यीय आयोगापुढे सुरू झाली आहे. बुधवारी चार साक्षीदारांपैकी एकाचे म्हणणे ऐकूण घेण्यात आले. तर, येत्या सहा ऑक्‍टोबरपर्यंत 17 साक्षीदार आपले म्हणणे आयोगापुढे मांडणार आहेत.

जुनी जिल्हा परिषद इमारतीमध्ये भीमा-कोरेगाव चौकशी आयोग कक्ष स्थापन केला असून याठिकाणी ही सुनावणी घेतली जात आहे. यावेळी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आयोगाकडे साक्ष नोंदविण्यासाठीचे वेळापत्रक ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी चार साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या जाणार होत्या. मात्र, दोन साक्षीदार उशिरा आल्याने तिसरा साक्षीदार चंद्रकांत पाटील यांची साक्ष नोंदविण्यात आली. गुरुवारी चार व्यक्तींच्या, शुक्रवारी पाच व्यक्तींच्या आणि शनिवारी चार साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)