भीमा कोरेगाव दंगलीची चौकशी करण्याची मागणी

संग्रहित छायाचित्र

जनता दलातर्फे तहसील कचेरीसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन

संगमनेर: पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा याठिकाणी मागील वर्षी 1 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीची निःपक्षपातीपणे चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी जनता दलातर्फे मंगळवारी (दि. 1) तहसील कचेरीसमोर एक दिवसीय धरणे व उपोषण करण्यात आले.

कोरेगाव भीमा दंगलीनंतर राज्यात झालेल्या तोडफोडीची नुकसानभरपाई संबंधितांना मिळावी. तसेच हिंसाचार प्रकरणी सामाजिक व मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे, सोमा सेन, सुधीर ढवळे, रोना विल्सन, महेश विचारे यांच्यावर दहशतवादी कारवाई प्रतिबंधक कलमे लावून त्यांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यांना अटक करण्यात आली.

त्यांच्यावरील खटले मागे घेण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरेगाव भीमा दंगलीत जीव गमवावा लागलेल्या राहुल फटांगडे याच्या मृत्यूचा तपास सीआयडीकडे असूनही त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. दंगलीस कारणीभूत असणाऱ्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची चौकशी पूर्ण करून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

संगमनेर व अकोले तालुका जनता दल अध्यक्ष साथी अर्जुन वाळे, शरद मोरे, कमू मणियार, कॉ. यादव पावसे, कॉ. दशरथ हासे, साथी गोरक्षनाथ घुले आदींसह कार्यकर्त्यांनी आंदोलन भाग घेतला. नायब तहसीलदार अशोक रंधे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)