भीमाशंकर विद्या मंदिराचे नुतनीकरण

भीमाशंकर- रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवनिमित्त भीमाशंकर विद्या मंदिर, टी. एस. बोराडे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिनोली येथे जुन्या कौलारू इमारतीच्या तेवीस लाखांच्या नुतनीकरणाचा शुभारंभ भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार सोनावले, ग्राम विकास विभागाचे माजी उपसचिव डी. बी. बोराडे, मुख्याध्यापक सुभाष रणसिंग, स्थानिक स्कूल कमेटीचे सदस्य हरिचंद्र हिंगणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप बेंडुरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)