भीमाशंकर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

ग्रामस्थांची टीका : पहिल्याच पावसात फटका बसणार

पुणे – भीमाशंकर मंदिराजवळ जाणाऱ्या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात येत आहे. त्यामुळे पहिल्या पावसातच हा रस्ता उखडून जाईल आणि त्याचा त्रास ग्रामस्थ व भाविकांना सोसावा लागण्याची भीती आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भीमाशंकर येथे मंदिरात दर्शनासाठी पायऱ्यांवाटे जावे लागते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक किंवा आजारी व्यक्तींना डोली करुन जावे लागते. पावसाळ्यात तर भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. या पार्श्‍वभूमीवर भीमाशंकर मंदिरापर्यत जाणारा जंगलातील कच्चा रस्ता पूर्ण करुन त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याचा निर्णय खेड प्रशासन व भीमाशंकर देवस्थानने घेतला होता. पण, वनखाते परवानगी देत नसल्याने हा रस्ता अनेक वर्षांपासून रखडला होता. अखेर भाविक आणि ग्रामस्थांची गरज लक्षात घेऊन या रस्त्याला वनखात्याने परवानगी दिली. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून हे काम सुरू झाले आहे. फक्त दीड ते दोन किलोमीटरचा हा रस्ता असून जंगलातून जाणारा हा रस्ता पूर्वी कच्चा होता. या रस्त्यावरुन वाहने जाऊ शकत नव्हती. सिमेंटचा रस्ता झाल्यावर वाहनांना जाणे सोयीचे होणार आहे.

पण, सिमेंटचा रस्ता तयार करताना त्यावर आवश्‍यक पाणी मारले जात नाही. त्याचबरोबर पावसाळ्यात सर्व पाणी या रस्त्यावरच येणार आहे. त्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही बाजूला नाले काढणे आवश्‍यक होते, पण ते काढण्यात आले नाहीत. राज्यातील सर्वाधिक पाऊस भिमाशंकर परिसरात पडतो. त्यामुळे असा कच्चा आणि अर्धवट रस्ता पावसाळ्यात टिकणार नाही, याबाबत आता ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. ज्या ठेकेदाराने हे काम घेतले आहे, तो येथे हजर नसतो. फक्त दीड किलोमीटरचा रस्ता व्यवस्थित करता येत नाही, यावरुन प्रशासन किती जागरुक आहे, याची प्रचिती येत असल्याची टीकाही ग्रामस्थांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)