भीमाशंकर कारखान्यात सांस्कृतिक गणेशोत्सव

पारगाव शिंगवे -तालुक्‍याच्या पुर्वभागातील पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सांस्कृतिक गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधानसभचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे संस्थापक – अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व किरणताई वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, कारखान्याचे संचालक शांताराम हिंगे, माऊली अस्वारे, कल्पना गाढवे, मंदाकिनी हांडे, सांस्कृतिक गणेश उत्सव मंडळाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत ढगे, सचिव कैलास गाढवे, किरण पोखरकर, विठ्ठल ढोबळे आदी मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. 14) ते सोमवार (दि. 17 ) या कालावधीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, प्रथम क्रमांकास 41 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 31 हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकास 21 हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास 15 हजार रुपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सोमवारी (दि. 17) रात्री 8 वाजता लावण्यांचा कार्यक्रम व मंगळवारी (दि. 18) सत्यनारायणाची महापूजा आणि दुपारी 3 ते 5 महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम व सायंकाळी मराठी नाटक “चोरी चोरी चुपके चुपके’ हा कार्यक्रम होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)