भीमाशंकर कारखान्याचे वजन काटे बिनचुक

वैधमापण शास्त्र विभागाचा अहवाल

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे वजन काटे बिनचुक असल्याचा निर्वाळा वजन काटे तपासणीसाठी आलेल्या भरारी पथकातील सदस्यांनी अहवालात दिला आहे, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुण्याच्या वैधमापण शास्त्र विभागाच्या निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने अचानक भेट देऊन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील वजन काट्यांची तपासणी केली. पथकाचे प्रमुख पुण्याचे वैध मापन निरीक्षक बी. पी. धुमाळ, लेखापरीक्षक वर्ग 1 (साखर) पी. डी. सांगळे आदींच्या पथकाने अचानक कारखान्यातील ऊस वजन काट्यांची तपासणी केली. यावेळी उसाने भरलेले टक व बैलगाड्यांच्या वजनांची कसून तपासणी केली. उसाच्या वजनासाठी वापरण्यात येत असलेले वजन काटे प्रमाणित असल्याची शहानिशा केली. यावेळी वजनात कोणत्याही प्रकारची तफावत आढळून आली नाही. याबाबतचा तसा अहवाल त्यांनी कारखान्यास दिला. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्‍निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार आदी हजर होते.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार ऊस उत्पादक शेतकरी, सभासद यांचे हित सदैव डोळ्यासमोर ठेवून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चालविला जातो. ऊस उत्पादकांचा विश्वास हीच आमची प्रेरणा आहे. कारखान्याचे सर्व वजन काटे हे शेतकऱ्यांना त्यांच्या उसाच्या वजनाची खात्री करण्यासाठी नेहमी खुले ठेवले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या वजनाची खात्री करता येते. येथे नेहमीच पारदर्शक पद्धतीने काम केले जाते. आजच्या भरारी पथकाच्या तपासणीनंतर ही बाब प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी व्यक्त केली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)