भीमाशंकर कारखान्याचे ऊसलागवड वेळापत्रक जाहीर

मंचर-दत्तात्रयनगर-पारगांव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांसाठी ऊस लागवड वेळापत्रक जाहीर केले आहे. ऊस लागवड धोरणाची अंमलबजावणी 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
ऊस लागवड वेळापत्रकाबाबत बोलताना कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे म्हणाले, आडसाली ऊस लागवडीसाठी 1 जुलै ते 30 ऑगस्ट 2018पर्यंतच्या कालावधीमध्ये को 86032, को. एम 0265 व व्हीएसआय 08005 या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. पूर्वहंगामी लागवडीसाठी 1 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर 2018 कालावधीमध्ये को-86032 व्ही. एस. आय 08005 या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. सुरू हंगामासाठी 1 डिसेंबर ते फेब्रुवारी 2019पर्यंत या कालावधीमध्ये को 86032, को. एम 0265 व व्हीएसआय 08005, एम. एस. 10001 या ऊस जातीच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे 1 जुलै 2018पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा सातबारा उतारा संबंधित विभागीय गट कार्यालयात देऊन देणे मागणी नोंदवावी. कारखान्यामार्फत उधारीवर वसूल पात्र तत्त्‌वाने राबविण्यात येणाऱ्या माती परीक्षण, ताग बियाणे, रासायनिक खते, जीवाणू खते, व्हीएसआयचे मल्टिमायक्रोन्युटियंट व मल्टिमॅक्रोन्युटियंट बेणे प्रक्रियेसाठी कीटकनाशक व बुरशीनाशक ऊस रोपे, बायोकंपोस्ट पुरवठा खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट, कुट्टी सुविधा लागवड व खोडवा, उसामधील ठिबक सिंचन योजना व त्यासाठी एकरी पाच हजार रुपये अनुदान, ऊस पीक स्पर्धा इत्यादी ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा. असे आवाहन बेंडे पाटील यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)