भीमाबाई पुरस्कार स्त्रियांच्या चळवळीचा गौरव : शिवूरकर 

सातारा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदूकोड बिलाच्याद्वारे महिलांना संपत्तीत समान हक्क व प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न करून स्त्री चळवळीचा पाया घातला आहे. यासाठी भारतीय स्त्रियांवर त्यांचे प्रचंड ऋण आहे. त्यांच्या मातोश्री भीमाबाई यांच्या नावाचा पुरस्कार हा स्त्रियांच्या चळवळीचाच गौरव आहे. त्याने हृदय भरून आल्याचे भावोद्‌गार जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ड. निशा शिवूरकर (संगमनेर) यांनी काढले.

येथील संबोधी प्रतिष्ठानच्यावतीने या वर्षीचा मातोश्री भीमाबाई 21 वा पुरस्कार जेष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांच्या हस्ते निशा शिवूरकर यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. विचार मंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह ऍड. हौसेराव धुमाळ उपस्थित होते.

-Ads-

याप्रसंगी प्रा. शिवाजी गायकवाड व निवृत्त लेफ्ट. कर्नल प्राचार्य शुभांगी सदा डुंबरे यांचा सत्कार प्रा. सुवर्णा यादव यांनी केला. निशा शिवूरकर यांनी पुरस्काराची रक्कम शोषण विरोधी चळवळीसाठी देण्याची घोषणा यावेळी केली.
ऍड. निशा शिवूरकर म्हणाल्या, देशासमोर सध्या भयानक स्वरूपाचे सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय स्वरूपाचे संकट उभे आहे.

परंपरेच्या बाजूने उभे रहायचे की महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, सहिष्णुता मुल्यांची जोपासना करण्याच्या बाजूने उभे रहायचे याचा महिलांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
सदा डुंबरे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन ऍड. हौसेराव धुमाळ यांनी केले. प्रा. प्रशांत साळवे यांनी आभार मानले. पुरस्कार वितरण सोहळ्यास विविध संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, जेष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ यांच्यासह नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)