भीमसृष्टी अद्याप अपुर्णावस्थेत

पिंपरी – महापलिकेच्या वतीने पिंपरी चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व भीमसृष्टीचे काम संथगतीने सुरु आहे. 14 एप्रिल रोजीच भीमसृष्टीचे उद्‌घाटन होणे अपेक्षित असताना स्मारकाचे काम आणि भीमसृष्टीतील म्युरल्सचे काम अद्यापही अपुर्णावस्थेत आहे, त्यामुळे भीमसैनिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. हे काम पुर्ण व्हायला आणखी किमान पाच महिने वाट पहावी लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

महापालिकेच्या वतीने सुमारे साडेचार कोटी रुपयांचा असलेल्या भीमसृष्टी प्रकल्पात 19 मुरल्सच्या माध्यमातून बाबासाहेबांचा जीवन प्रवास उलगडण्यात येणार आहे. मुळ छायाचित्रांवरुन प्रसंग चित्रण, शहरातील पहिलेच ब्रॉंझ धातुचे म्युरल्स, मार्बलवर सुवर्ण अक्षरात प्रसंगांची माहिती असणार आहे. बाबासाहेबांकडून राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना राज्यघटना सुपूर्त करतानाचा प्रसंग, नागपूर येथे दिक्षा समारंभात भाषण करताना जमलेला जनसमुदाय, महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिक मधील काळाराम सत्यागृह, लहानपणी शाळेच्या बाहेर बसून शिक्षण घेणारे बाबासाहेब, प्रतिकूल परिस्थितीत सरकारी दिव्याखाली बसून अभ्यास करतानाचा प्रसंग आदी महत्त्वपुर्ण प्रसंग म्युरल्सच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहेत.

नोव्हेंबर 2017 पासून आपल्याकडे या कामाची जबाबदारी आली. तेव्हापासून कामाने गती घेतली आहे. 19 म्युरल्सचे काम झाले आहे. काही प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी आल्या कारणाने काम संथगतीने सुरु होते. मात्र आता सर्व प्रशासकीय बाबी पुर्ण झाल्या असून येत्या चार महिन्यांत काम पुर्ण करण्याचा प्रयत्न असेल.
– संजय कांबळे, कार्यकारी अभियंता, महापालिका उद्यान विभाग.

कामाची सद्यस्थिती पाहता येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत भीमसृष्टीचे काम पुर्ण होणार नाही, असे चित्र स्पष्ट दिसत आहे. एप्रिल 2014 रोजी भीमसृष्टीचे लोकार्पण होणे गरजेचे होते. मात्र, महापालिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे हे काम लांबणीवर पडले. महापालिकेने गांभीर्यपुर्वक लक्ष घालून लवकरात-लवकर काम पुर्ण करावे.
– गिरीश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)