भीमशक्‍ती संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी विजय डोळस

पुणे येथील बैठकीत एकमताने निवड

राजगुरूनगर- भीमशक्‍ती संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी राजगुरुनगर येथील विजय शिवराम डोळस यांची एकमताने निवड झाली आहे.
पुणे येथे झालेल्या संघटनेच्या बैठकीत डोळस यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. यावेळी भीमशक्‍ती संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष रतन गीरीशिलार, प्रदेश प्रतिनिधी आदिनाथ कांबळे, जिल्हा कार्यध्यक्ष बुद्धभूषण निकम, अंकुश सोनवणे, राजाभाऊ भोसले, जिल्हा युवक अध्यक्ष अजय जानराव, इंदापूर तालुका अध्यक्ष युवराज पोळ, खेड तालुका भीमशक्ती संघटनेचे कार्याध्यक्ष अनिल जाधव, संघटक किशोर डोळस, सुरज मोरे, नितीन भद्रिके, किरण गावडे, संतोष देठे, निएश वाघमारे, यांच्यासह मोठ्या संख्येने भीमशक्ती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यात माजीमंत्री तथा भीमशक्‍ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना काम करीत आहे. भीमशक्‍ती संघटनेचे काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम डोळस हे जिद्दीने करीत आहेत. खेड तालुक्‍याबरोबर जिल्ह्यात त्यांनी भीमशक्‍ती संघटना मजबूत केली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत चंद्रकांत हंडोरे यांनी विजय डोळस यांची पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड केली आहे. डोळस यांनी आतापर्यंत भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून तालुक्‍यातील अनेक प्रश्‍नांसाठी मोठी आंदोलने केली आहेत. त्याच्या कार्याची दखल घेत त्यांना कॉंग्रेस कमिटीने तालुका अध्यक्ष पदाची जबादारी दिली आहे.

  • संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हाभर गाव तिथे भीमशक्‍ती संघटना शाखा सुरू केल्या जातील. तालुकास्तरीय नवीन कार्यकारिणीची निवड करून त्यांचा प्रशिक्षित केले जाणार असून त्यांच्या माध्यमातून सभासद अभियान येत्या 26 जानेवारी पासून जिल्ह्याभर केले जाणार आहे. बहुजन समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी भीमशक्‍ती संघटना जिल्हाभर काम करील.
    -विजय डोळस, जिल्हा अध्यक्ष, भीमशक्‍ती संघटना, पुणे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)