भीमरत्न पुरस्काराने गोपाल मोहरकर सन्मानित

आळंदी- श्रीक्षेत्र अलंकापुरी येथे गेल्या दोन वर्षांपासून स्वच्छतेचा ठेका घेतलेले तसेच श्रीक्षेत्र जेजुरीगड व शहर स्वच्छतेचे नुकतेच आरोग्य विभागाचे काम हाती घेतलेले श्री स्वामी समर्थ सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा गोपाल मोहरकर यांना संविधानदिनी माजी आमदार तथा न्यायविधी तज्ज्ञ एल. टी. सावंत यांचे हस्ते भीमरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रा. सागर, खेड तालुका आरपीआयचे अध्यक्ष संतोष डोळस, यशवंत लाखे, भानुदास दावलकर व मंचचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराने सन्मानित करण्याचे प्रमुख कारण असे की, गोपाल मोहरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व आरोग्य कर्मचारी टिमने कसोशिने काम करीत आळंदी स्वच्छ ठेवण्याचे काम करीत आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या व दररोज हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येत असलेल्या तीर्थक्षेत्रात रोज शेकडो टन कचरा तयार होतो, तो नियमित उचलणे अल्पावधीतच शहर कचरा कुंडीमुक्‍त करणे मोठे जिकिरीचे व अवघड काम होते. या सर्व गोष्टींवर मात करीत मोहरकर यांनी समोर येणाऱ्या संकटांना तोंड देत कचरा कुंडीमुक्‍त केल्याने त्यांना जेजुरी (ता. पुरंदर) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने गौरविण्यात आल्याचे संयोजकांतर्फे सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)